कळमेश्वर: कळमेश्वर हादरले! विहिरीतून युवकाचा मृतदेह बाहेर
दि. 25 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सावली माऊली येथील शेतातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.