माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात भिवंडी पडघा पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल ;
शस्त्राचा धाक, जबरदस्तीने मद्यपान आणि फार्महाऊसवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप
कल्याणचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल.
पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने तरुणीला बापगाव परिसरातील फार्महाऊसवर नेल्याची तक्रार.
पिस्तूल दाखवून धमकावत जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर दोघांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा तरुणीचा आरोप
काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्या मदतीने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलीस तपास सुरू
Kalyan, Thane | Sep 17, 2026