अंबड: होळी निमित्त विधवा महिलांना साडी वाटप; संघर्ष योद्धा हरीश राठोड यांचा श्रीराम तांडा येथे सामाजिक उपक्रम
Ambad, Jalna | Mar 4, 2026 होळी निमित्त विधवा महिलांना साडी वाटप; संघर्ष योद्धा हरीश राठोड यांचा सामाजिक उपक्रम अंबड (जि. जालना) – अंबड तालुक्यातील मौजे रुई तांडा येथे होळी सणाच्या निमित्ताने विधवा व गरजू महिलांना साडी वाटप करून होळी साजरी करण्यात आली. बंजारा समाजातील तरुण व ST आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे संघर्ष योद्धा हरीश भैया राठोड यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. हरीश राठोड यांनी ST आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी उपोषण, धरणे आणि आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले आहे. समाजाला ST आरक्षण मि