नरखेड: गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
Narkhed, Nagpur | Jun 30, 2026 बाजारगाव (वार्ड क्र. ४) येथे अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेवर कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ३१ ग्रॅम गांजा आणि विक्रीतून मिळालेली २,४२० रुपये रोख रक्कम, असा एकूण ३,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.