विक्रोळी कन्नमवार नगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी स्वच्छता मोहीम राबवली
#
आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी कन्नमवार नगर १ येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मैदान येथे शिवसेना माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सदर ठिकाणी या मोहिमेत सहाय्यक आयुक्त एस विभाग कसगीकर, सहाय्यक अभियंता परिरक्षण राहुल जाधव तसेच शिवसेना महिला व पुरूष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते