गोवंडीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अनधिकृत कृत्यांच्या विरोधात मोर्चा
गोवंडी येथे आज शनिवार दिनांक १० जानेवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अनधिकृत कृत्यांच्या विरोधात मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा गोवंडी येथील पालिका एम पूर्व कार्यालय पासून निघाला असून पीएमजीपी कॉलनी येथे त्याचे सभेत रूपांतर होणार आहे.भाजप नेते आमदार नितेश राणे यात सहभागी झाले आहेत.