रामटेक: भंडारबोडी येथील मोजमाप पुस्तिकेवर बनावट स्वाक्षरी करण्यावरून रामटेक येथील कनिष्ठ अभियंत्यांची आत्महत्या
Ramtek, Nagpur | Jul 8, 2026 पो स्टे रामटेक येथील शीतलवाडी येथे दिनांक 2 जुलैला मृतक नामे सौरव धर्मा पवार वय 28 वर्ष रा. सितलवाडी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस स्टेशन रामटेक येथे मर्ग दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत कनिष्ठ अभियंता पवार यांनी भंडारबोडी बांधकाम प्रकरणात मोजमाप पुस्तिकेवर उपअभियंता श्री रत्नदीप परामटेके यांची स्वाक्षरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने आत्महत्या केली असावी असे पोलिसांनी प्रेस नोट द्वारे सांगितले आहे.