रामटेक: पर्यावरणाचे संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज; माजी आ. डी. एम.रेड्डी यांची पत्र परिषदेत माहिती
Ramtek, Nagpur | Jun 4, 2026 डी. रामी रेड्डी संजीवनी मेमोरियल संस्था मनसर द्वारे मागील २५ वर्षांपासून अर्थात स्थापनेपासूनच रामटेक विधानसभा क्षेत्रात विविध सार्वत्रिक जागी, शाळा, महाविद्यालय, संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, अंगणवाडी, मैदान परिसरात वृक्षारोपण केले जात आहे. या साखळीत 5 जूनला पर्यावरण दिनी जागोजागी वृक्षारोपण करण्याचा संकल्पाची माहिती माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्र परिषदेत दिली.