महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची “ड”, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रिम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर इत्यादी सर्व प्रकारच्या व्यवसायांना यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 अन्वये देण्यात आलेल्या व्यवसाय परवान्यांचे दरवर्षी नुतनीकरण करण्यात येते. नागरिकांना / व्यावसायिकांना व्यवसाय परवाना उपलब्ध करून देण्याची तसेच त्यांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया पारदर्शी व सुलभ होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या व्यावसायिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडून कलम 376 अन्वये व्यवसाय परवाना घेतलेला आहे आणि ज्या व्यावसायिकांनी घेतलेल्या व्यवसाय परवान्याची कालमर्यादा संपुष्टात आलेली आहे,