सेलू: नाल्याशेजारी भट्टी लावून मोहा दारू काढणाऱ्या व्यक्तीवर हिंगणी शिवरात सेलू पोलिसांची कारवाई, ₹२६६००० मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Nov 7, 2024 गावठी दारूच्या रनिंग भट्टीवर पोलिसांनी धाड टाकून मोहा दारुसह २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. ही कारवाई ता. ७ गुरुवारी दुपारी १.१५ वाजता मौजा हिंगणी शिवारात नाल्यालगत सेलू पोलिसांनी केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सुधाकर नारायण इखार रा. हिंगणी हा घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये दुपारी ३.४० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.