जालना: जालना-अंबड रोडवर 6 किलो गांजा जप्त; 2 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना शहरात गांजाची अवैध विक्री व वाहतूक करणार्यांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 6 किलो 110 ग्रॅम गांजासह एकूण 2 लाख 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गांजा दिपक नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना ते अंबड रोडवर ही कारवाई केली.