सेंदूरवाफा येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्यावतीने मंगळवार दि.4नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता भव्य रथयात्रेचे आयोजन झेंडा चौक येथून करण्यात आले.या यात्रेमध्ये भजन स्पर्धा व गेट सजावट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.रथयात्रेचे हे80 वे वर्ष असून सुमारे एक लाख भाविकांनी रथातील विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले आहे तसेच रथयात्रेत जीवनावश्यक वस्तूंची व इतरही दुकाने लागली असून त्यात करोडोंची उलाढाल झाली आहे.गावात कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेच्या निमित्ताने भाऊबीज सण साजरा केला जातो