गोंदिया: वाघाच्या हल्ल्यात उईके यांचा दुर्दैवी मृत्यू, शासनाने दिली २५ लाखांची मदत
गोंदिया तालुक्यातील बाम्हणी गावात वाघाच्या हल्ल्यात कृनाल कैलास उईके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माजी खासदार नाना पटोले यांनी कुटुंबाला भेटून धीर दिला. शासनाने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबाला दिली असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.