नरखेड: संसदीय राजकारणातील 'महामेरू' शरद पवार यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी; अनिल देशमुख यांनी व्यक्त केला अभिमान
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या ऐतिहासिक वाटचालीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनापासून शुभेच्छा देत पवारांच्या अतुलनीय संसदीय कारकिर्दीचा गौरव केला आहे.अनिल देशमुख यांनी आपल्या संदेशात शरद पवार यांच्या संसदीय प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले.