शौचास गेलेल्या मुलीचा हात धरून विनयभंग शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत शौचास गेलेल्या मुलीचा हात धरून विनयभंग केला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक सहा जुलै रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना दिली आहे .बीड जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. शौचास गेलेल्या या अल्पवयीन मुलीचा हात धरून एका व्यक्तीने तिचा विनयभंग केला.