कळमेश्वर: धक्कादायक! सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या पत्नीला पतीनेच केली गंभीर मारहाण
नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना कळमेश्वर ब्राह्मणी येथे समोर आली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी "सात जन्मी हाच पती मिळावा" म्हणून मनोभावे पूजा करून देवाकडे मागणी करणाऱ्या पत्नीला तिच्याच पतीने विटेने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.