भोकरदन: सोमठाणा येथे भाजपा ज्येष्ठ नेते मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते शंकर पटाचे करण्यात आले उद्घाटन
आज दिनांक एक एप्रिल 2020 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते जालना लोकसभा मतदारसंघातील व बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे शंकर पटाचे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे सोमठाणा येथील जगदंबा माता देवी यात्रा उत्सव निमित्त शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार नारायण कुचे यांच्यासह शंकर पट शौकीन व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.