अंबरनाथ: बदलापूरच्या बेलवली परिसरात लागली आग; एक नवी कार जळून खाक
आज दिनांक २८ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास बदलापूर येथील बेलवली परिसरात आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात मोठ नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत एक नवी कार देखील जाळून खाक झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याच सांगितलं जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्याचे प्रयत्न करू लागले. अखेर दीड तासाच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.