अंबरनाथ: बदलापूरच्या उल्हास नदी भराव प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार, बदलापूर येथे खासदार सुरेश म्हात्रे
बदलापूरच्या उल्हास नदी भराव प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार अशी माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. ते आज दिनांक २७ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास बदलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. आज बदलापूर येथे खासदार सुरेश म्हात्रे यांनी नालेसफाईची पाहणी केली. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.