अंबरनाथ: बदलापूर येथील उल्हास नदीचा नवीन पूल वाहतुकीसाठी बंद
सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बदलापूरच्या विविध ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूर मधल्या अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्या असून आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 12च्या सुमारास बदलापूर येथील उल्हास नदीचा नवीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. उल्हास नदीने उच्चांक पाणी पातळी गाठली असून हा पूल बंद करण्यात आला आहे.