अंबरनाथ: बदलापूर येथे शिंदेंच्या शिवसेनेकडून तिरंगा रॅलीचे आयोजन
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईमध्ये अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी केलेल्या या कारवाईच देशभरातून भारतीय सैनिकांना समर्थन मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दि. १८ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास बदलापूर येथे शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सैनिकांना समर्थन देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून या रॅलीमध्ये स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.