अंबरनाथ: बदलापूर येथे भाजपने तिरंगा रॅली काढून केलं शक्तिप्रदर्शन
आज सकाळी शिंदेंच्या शिवसेनेने बदलापूर येथे तिरंगा रॅली काढली. त्यानंतर आज १८ मे रोजी सायंकाळी ५च्या सुमारास भाजपने देखील बदलापूर मध्ये तिरंगा रॅली काढून मोठ शक्तिप्रदर्शन केलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईमध्ये अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी केलेल्या या कारवाईच देशभरातून कौतुक केलं जात आहे. भारतीय सैनिकांना समर्थन देण्यासाठी आज भाजपच्या वतीने राज्यभरात तिरंगा रॅली काढली आहे.