जालना: ग्रामपंचायतींच्या हक्काच्या कामांची परस्पर विक्री? जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अॅड. अनिल सरकटे यांचे उपोषण
Jalna, Jalna | Sep 8, 2026 जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत विकासकामे करताना तसेच जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कामे राबविताना संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन आवश्यक परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घेणे अपेक्षित असतानाही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करीत अॅड. अनिल सरकटे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवार दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतींना अंधारात ठेवून अनेक विकासकामे मंजूर केले.