नरखेड: स्वाधार योजना: अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत
Narkhed, Nagpur | May 26, 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचे अर्ज 'Sent Back' करण्यात आले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपल्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे