पाचोरा: गिरणेच्या पारावर दिवाळी विशेष अंकाचे पालकमंत्री व आमदारांच्या हस्ते निर्धार मेळाव्यात प्रकाशन,
पाचोरा भडगाव मतदार संघातील पत्रकारिता क्षेत्रात 35 वर्षा पासून निस्वार्थ प्रदीर्घ सेवा बजावत असलेले जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांच्या गिरणेच्या पारावर या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, अमळनेर येथील आमदार शिरीष दादा चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांचेसह अनेक आजी माजी आमदारांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने झाले,