रोहा: दोन महिन्यांत ४.३० लाख विनातिकीट प्रवाशांकडून ३० कोटींचा दंड वसूल
Roha, Raigad | Jun 4, 2026 नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जोरदार कारवाई केली आहे. मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते मे २०२६ या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवासाच्या ४ लाख ३० हजार प्रकरणांमधून तब्बल ३० कोटी १३ लाख रुपयांची उल्लेखनीय दंड वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २ लाख ७५ हजार प्रकरणांमधून १२ कोटी २ लाख रुपये वसूल करण्यात आले होते.