धर्माबाद: नगर पालिका निवडणुकीत विना परवाना उमेदवारांच्या प्रचाराची वाहने फिरत असल्याचा आरोप; मोटर वाहन अधिकाऱ्यांनी केली तपासणी
धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सध्याला प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचाराकरिता ऑटो व चारचाकी वाहनाचा आधार घेत ध्वनीक्षेपक लावून गल्लोगल्ली फिरत आहेत, मात्र यातील अनेक वाहने ही विना परवाना फिरत असल्याचा आरोप एका उमेदवाराने केल्याने आजरोजी सकाळपासून शहरात फिरत असलेली वाहने नगर पालिका परिसरात आणले गेले असून मोटर वाहन अधिकारी याची तपासणी करत आहेत.