सुपर स्वच्छ लीग मधील देशातील अग्रगण्य शहर म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्या अनुषंगाने कोपरखैरणे नमुंमपा शाळा क्रमांक 31 मध्ये, वाशी सेक्टर 10 परिसरामध्ये, तुर्भे विभागातील सानपाडा गुरुद्वारा सेक्टर 9 परिसरामध्ये, सायन पनवेल महामार्गावरील बेलापूर भागात, ऐरोली सेक्टर -1 गुरुद्वारा परिसरात तसेच दिघा विभागातील विष्णुनगर व सभोवतालच्या डोंगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीमा अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आल्या. स्वच्छ नवी मुंबई शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दैनंदिन स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असतानाच 28 व 1 तारखेला होणा-या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत आहेत.