नरखेड: सहा वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी
६ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, ५ मे २०२६ रोजी कठोर शिक्षा सुनावली. योगेश उर्फ राहुल वासुदेव रेवतकर (२२ वर्षे, राहणार नरखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.ही घटना ३० जुलै २०२३ रोजी घडली होती. पीडित बालक (वय ६ वर्षे) आपल्या घरासमोर खेळत असताना, आरोपीने त्याला १० रुपयांचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.