अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म चा अंदाज न आल्याने रेल्वे रुळावर पडली अंध व्यक्ती, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये अंबरनाथ हून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहणाऱ्या एका अंध व्यक्तीला प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने थेट रेल्वे रुळावर कोसळले. कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा जवान देवरे यांच्या गोष्ट लक्षात येतात जीवाची पर्वा न करता उडी मारून अंध व्यक्तीचे प्राण वाचवले. तसेच सुरक्षा जवनाला मदत करण्यासाठी इतर व्यक्ती देखील धावून आले.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.