अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये झाली हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
आज दि १० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकावर २ प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली. ऐन गर्दीच्या वेळेस ही हाणामारी झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये चढण्याच्या वादावरून या ठिकाणी हाणामारी झाली असल्याचं समजतंय.