अंबरनाथ: बदलापूर येथे गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू
बदलापूर परिसरामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसोबत गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गार्डनमध्ये असलेल्या विद्युत पोल मध्ये विद्युत प्रवाह सुरू होता आणि त्याला त्या चौदा वर्षाच्या मुलाने हात लावल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस अधिकारी -कर्मचारी,महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास करत आहेत. हलगर्जीपणा करणारे गार्डन व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली जात