जालना: दुधना नदीपात्रातून वाळूची चोरी; गणेशनगरात रॉयल्टी न भरलेला 22 ब्रास साठा आढळला; महसूल अधिकार्याची फिर्याद
Jalna, Jalna | Sep 10, 2026 जालना तालुक्यातील दुधना नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून गणेशनगर शिवारातील गट क्रमांक 77 मध्ये सुमारे 20 ते 22 ब्रास मातीमिश्रित वाळूचा बेकायदा साठा केल्याचा प्रकार महसूल पथकाच्या पाहणीत उघडकीस आला. याप्रकरणी किशोर भगवान कावळे (रा. गणेशनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दि.10 सप्टेंबर 2026 रोजी दु. 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाच्या गौण खनिज उत्खनन पथकातील ग्राम महसूल अधिकारी विश्रांत राधाकृष्ण अंभोरे आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी फिर्याद दिली.