जालना: जाफ्राबाद तालुक्यातील हनुमंत खेडा येथे अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाची कारवाई; जेसीबीसह सहा ट्रॅक्टर ताब्यात
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जाफ्राबाद तालुक्यातील मौजे हनुमंतखेडा येथे सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिक पाणिग्रही यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध गौण खनिज उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन तसेच अवैध वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडण्यात आले. बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हनुमंतखेडा येथे ही कारवाई केली.