नरखेड: क्रांतीज्योती' प्रकल्प: नरखेडमध्ये निराधार कुटुंबांच्या आधारासाठी पुढाकार
Narkhed, Nagpur | Apr 25, 2026 शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि ज्या कुटुंबांनी कर्ता पुरुष गमावला आहे, अशा कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी 'क्रांतीज्योती' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पंचायत समिती नरखेड येथे सुरू करण्यात आला.पीडित कुटुंबांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे या कुटुंबाचे उद्देश आहे.वनराई फाऊंडेशन (काटोल) आणि पंचायत समिती (नरखेड) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प राबवला जाणार आहे.हा प्रकल्प १००% लोकवर्गणीतून चालविला जाणार आहे.