नागपूर शहर: नागपुरात हॉर्न वाजवल्याने तरुणावर टॉमीने हल्ला; दोन आरोपी अटकेत
रस्त्यात उभी असलेली चारचाकी गाडी बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी एका तरुणावर लोखंडी टॉमीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना रामनगर चौकात घडली असून, राहुल कनोजिया असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.गोकुळपेठ येथील रहिवासी राहुल कनोजिया आपल्या कुटुंबीयांसह घरी जात असताना, रामनगर चौकात एक चारचाकी गाडी रस्त्यात उभी असल्याने त्यांचा रस्ता अडवला गेला.