रोहा: लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान 2 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
Roha, Raigad | May 2, 2026 प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानक दरम्यान दोन अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या निर्णयामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक 01003 ही विशेष गाडी ४ मे २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.