वाळवा: इस्लामपूररात रेकॉर्डवरील गुंडाचा निर्घृण खून ; आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे
Walwa, Sangli | Aug 1, 2025 इस्लामपूर शहरातील फाळकूट गुंडांच्या गुन्हेगारी कारवाया वाढत चालल्या आहेत. त्यातच आज, शुक्रवारी दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिघा जणांच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजर झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. खुनाच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. यावर्षातील चौथ्या खुनाची नोंद झाली. रोहित पंडित पवार