रामटेक: दुधाळा,कवडक, सोने घाट शेत शिवारात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी दहशतीत
Ramtek, Nagpur | Apr 28, 2026 पोलीस स्टेशन रामटेक येथून दीड- दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत दुधाळा,सोनेघाट कवडक गावाशेजारील शेती शिवारात रात्रीतून अज्ञातांद्वारे कृषी साहित्य, मोटर पंप, धान्य, पशुखाद्य चोरीला जाण्याचे प्रमाण मागील काही दिवसात कमालीची वाढले आहे. त्यामुळे शेतकरी पुरते भयभीत झाले आहेत. शेतात पशु बाधणे किंवा कृषी साहित्य, खाद, बियाणे,धान्य ठेवणे आता सुरक्षित राहिलेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.