रामटेक: नौकरच निघाला चोर, अवघ्या दोन दिवसात रामटेक पोलिसांनी लावला चोरीचा छडा
Ramtek, Nagpur | Jun 15, 2026 बस स्टँड चौक रामटेक yethi शिवशंकर हॉटेलचे मालिक शंकर सावरकर वय 71 वर्ष रा. टिळक वार्ड रामटेक यांनी तक्रार दिली होती की 12 जूनला सकाळी साडेसहा ते ६:४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या हॉटेलच्या शेडच्या एका लोखंडी बेंच वरून अंदाजे 35 ते 40 हजार रुपये असलेली एक बॅग एका अज्ञाताने पळवली होती. रामटेक पोलिसांनी 15 जूनला या आरोपीचा शोध लावला असता आरोपी हा हॉटेलचा नौकरच निघाला. आरोपीचे नाव लहू उर्फ लावा नंदूजी कुंभरे वय 25 वर्ष रा. उमरी त. रामटेक असे असून त्याने चोरी केल्याचे कबुली दिली आहे.