जालना: जालना जिल्हा युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप; प्रकुलगुरू डॉ.प्रविण वक्ते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; विजेत्या बक्षिस
Jalna, Jalna | Sep 9, 2026 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचा लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात जल्लोषात समारोप करण्यात आला. प्रकुलगुरू डॉ.प्रविण वक्ते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाना पारितोषिक वितरण करण्यात आले. बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले.