जालना: फरार गुटखा आरोपीच्या मुसक्या आवळल्या; राजूरमध्ये 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त; राजूरमध्ये एसपी पथकाची धडक
Jalna, Jalna | Sep 9, 2026 जालना जिल्ह्यात अवैध गुटख्याची वाहतूक आणि विक्रीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली एसपी पथकाने भोकरदन तालुक्यातील राजूर येथे धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 95 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि 40 लाख रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.