जालना: जिल्हा परिषदेसमोर दिव्यांग कार्यकर्त्याचे अर्धनग्न आमरण उपोषण
Jalna, Jalna | Oct 31, 2026 जिल्हा परिषदेतील कथित अनियमिततेची चौकशी आणि दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी दिव्यांग कार्यकर्ते विलास वाघमारे यांनी अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे. बांधकाम विभागातील गैरप्रकारांचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यावर केला आहे.