रामटेक: श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यमंत्र्यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन
Ramtek, Nagpur | Jul 11, 2026 शुक्रवार दि. 10 जुलैला राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बहुप्रतिक्षित, बहु अपेक्षित श्रीराम मंदिर रामटेक येथे ट्रस्ट निर्माण करण्याचे स्वप्न 'श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक 2020 ' च्या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने पूर्ण झाले. यानंतर हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेणारे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी शनिवार दि. 11 जुलैला सकाळी 11 वाजता रामटेक येथील गडमंदिरावर जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. व सर्वांचे संकल्प पूर्तीसाठी आभार व्यक्त केले.