नरखेड: किरकोळ वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक, नरखेड हद्दीत थरार
Narkhed, Nagpur | May 12, 2026 नरखेड येथील आठवडी बाजारात किरकोळ शिवीगाळीच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ९ मे रोजी राजू भीमराव उईके याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून धक्कादायक माहिती समोर आली.