Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मीरा-भाईंदरमध्ये दुर्दैवी घटना..! दुचाकीस्वारावर नारळाचे झाड कोसळले; माजी उपनगराध्यक्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू... ठाणे । मीरा-भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या झाड कोसळण्याच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल हे मीरा-भाईंदरचे माजी उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचे पुत्र होते. राई गाव परिसरात दुचाकीवरून जात असताना अचानक नारळाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. डॉक्टरांनी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. या घटनेनंतर धोकादायक झाडांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. 📍 धीरज घोलप महाव्हाईस न्यूज, मुंबई #MiraBhayandar #Mumbai #TreeFall #RoadAccident #Maharashtra #Monsoon #PublicSafety #LatestNews #MumbaiNews

Amravati, Amravati | Jul 3, 2026