नरखेड: नरखेड येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 13, 2026 नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गजानन नांदणे, कुसुमाकर सोनोने यांचा समावेश आहे. आरोपींकडून देशी तसेच मोह फुलाची दारू जप्त करण्यात आली आहे. आरोपीं विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.