रामटेक: मनसर येथे मध्यरात्री स्वयंपाक खोलीत पकडला विषारी नाग ; सर्पमित्राने केले रेस्क्यू
Ramtek, Nagpur | Jul 13, 2026 मनसर येथे रविवार दिनांक 12 जुलै च्या मध्यरात्री एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. येथील एका घरातील स्वयंपाक खोलीत एक सहा फूट विषारी नाग भांडे ठेवण्याच्या फळीवर चक्क फणा काढून फूत्कारे देत असल्याचे दिसल्याने घरच्यांना दरदरून घाम फुटला. सर्पमित्राला बोलाविण्यात आले. सर्पमित्र सागर धावडे यांनी तात्काळ सुरक्षित रेस्क्यू करून नागाला पकडले.