रामटेक: कांद्री परिसरात महामार्ग ओलांडणारा इसम अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार
Ramtek, Nagpur | Jul 1, 2026 पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री परिसरात बुधवार दिनांक 30 जूनच्या रात्री महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 60 वर्षीय इसम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या इसमाचे नाव देवीप्रसाद टेकाम रा. मनसर असे असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत तात्काळ मनसर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यानंतर मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.