जालना: सोलार पॅनल साहित्याचे गोदाम फोडणारा मुद्देमालासह जेरबंद; कदीम जालना पोलीसांची कारवाई
Jalna, Jalna | Aug 13, 2026 जालना शहरातील नूतन वसाहत भागातील जांगडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील सोलार पॅनल साहित्याच्या गोदामाचे कुलूप तोडून सुमारे आठ लाख रुपयांचे साहित्य लंपास करणार्या चोरट्याला कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले. गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून चोरीच्या साहित्यापैकी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नूतन वसाहत परिसरातील जांगडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सोलार पॅनलचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम होते.